मुंबई – अभिनेत्री रवीना टंडन हे बॉलिवूडमधील सर्वांच्या परिचयाचे नाव. ९० च्या दशकात अभिनयाला सुरुवात केलेल्या रवीनाने अल्पावधीतच अक्षय कुमार आणि गोविंदा सारख्या सुपरस्टारसोबत अनेक हिट चित्रपट दिले.आजही रवीनाचे लाखो चाहते आहेत. नुकतंच रवीनाने एका इंग्रजी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीती आपल्या गोव्यातील एका चाहत्यांबद्दलचा किस्सा सांगितला आहे. या चाहत्याने रवीनाला आणि त्याच्या कुटुंबियांना चांगलाच त्रास दिला होता.
मुलाखती दरम्यान रवीनाने सांगितले की,तिचा एक चाहता तिच्यासाठी अक्षरशः वेडा झाला होता. हा चाहता तिला थेट आपल्या रक्ताने पत्र लिहून पाठवायचा.एवढ्यावरच न थांबता या चाहत्यांची मजल आपल्याला अश्लील फोटो पाठवण्यापर्यंत गेल्याचे यावेळी रवीनाने सांगितले. रवीना पुढे म्हणते,गोव्यात राहणार हा चाहता इतका वेडा होता की,जिथे जाईल तिथे रवीनाचा विवाह माझ्यासोबत झाला असलयाचे सांगत फिरत होता.
दुसऱ्या एका चाहत्यांबद्दल सांगताना रवीना म्हणते,माझा आणखी एक चाहता होता जो केवळ माझ्या घरासमोर येऊन बसायचा. मी केव्हाही घरासमोर पाहिलं तरी मला तो तिथेच दिसायचा असंही रवीनाने यावेळी सांगितलं. कौटुंबिक कारणासाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर रवीना थेट केजीएफ २ या चित्रपटात दिसली होती. केजीएफमध्ये रवीनाने साकारलेली ‘रमिका सेन’ सर्वांच्याच लक्षात राहिली होती.