मुंबई – राजकारण आणि बॉलिवूड यांचं नातं काही नवीन नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातीलही अनेकांचे बॉलिवूडकरांशी मैत्रिपूर्ण संबंध आहेत. याबद्दल च्या बातम्या आणि व्हिडिओ सुद्धा तुम्ही कित्येक वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहिले आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.
शरद पवार यांचे नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र ‘जय पवार’ यांचा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबतचा हा फोटो आहे. दरम्यान, व्हायरल झालेला हा फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट होत नाही आहे. मात्र या फोटोमध्ये जय पवार आणि उर्वशी रौतेला या दोघांसह आणखी एक व्यक्ती दिसत आहे. सध्या त्यांना हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसून येते आहे.
View this post on Instagram
या फोटोत उर्वशीने स्कीन कलरचा वनपीस घातलाय. तिच्या शेजारी जय आणि उर्वशीचा कॉमन मित्र आणि या मित्राच्या शेजारी जय उभे आहेत. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.