मुंबई : सध्या सगळीकडेच ‘मनी हाइस्ट’ या वेब सिरीजची चर्चा होताना दिसत आहे. या वेब सीरिजचे वेड जेवढे तरुणाईला लागले आहे तेवढे आता राजकारण्यांवर देखील याचे फिवर चंदहले असल्याचे दिसत आहे. कारण दरम्यान सध्या सोशल मीडियावर अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही पोस्ट केली असून चांगलीच चर्चा रंगली आहे. या ट्विटमध्ये यशोमती ठाकूर यांनी नामोल्लेख न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे.
तो लुटायलाच आलेला आहे. मात्र त्याने जगासमोर स्वतःचं असं चित्र उभं केलंय जसं की तो मसीहाच आहे. 😊 मी राजकीय विषयांवर नाही तर #MoneyHeist बद्दल बोलतेय. गैरसमज झाल्यास योगायोग समजावा.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 4, 2021
“तो देश लुटायलाच आला आहे. मात्र असे दाखवत आहे जसं की तो मसीहा आहे, हे मी कोणाबद्दल बोलत नाही तर मनी हाईस्ट या नव्या वेब सिरीजबद्दल बोलत आहे. कुणाबद्दल हे वाटल्यास तो केवळ योगायोग समजावा,” असं ट्वीट यशोमती ठाकूर यांनी केलं आहे.
यशोमती ठाकूर सातत्याने भाजपाची कार्यपद्धती, देशातील बेरोजगारी, महागाई आणि गेल्या काही दिवसात सातत्याने वाढ होत असलेली गॅस पेट्रोल डिझेल या इंधनाची दरवाढ या विषयांवरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. यावेळी त्यांनी मोदींचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू आहे.