पुणे/ येरवडा – आई आणि प्रियसीच्या कचाट्यात सापडलेल्या एका तरुण वाडिया महाविद्यालयाजवळील एक बड्या झाडावर जाऊन बसला होता. अग्निशमन दल आणि पोलिसांनी समजून घालूनही तो खाली उतरत नव्हता. सर्वांनाच्या त्याच्या जीवाचे काही बरे वाईट होईल अशी भिती वाटत होती. अग्निशमन दलाचे जवान शिडी तोकडी पडत असल्याने त्याच्यापर्यंत पोहचू शकत नव्हते.
मात्र एका कार्यकर्त्यांने मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी असलेली एक मोठी क्रेन घेऊन तरुणाकडे धाव घेतली. त्याचे तब्बल तासभर समुपदेशन करुन त्याला क्रेनच्या बकेटमध्ये बसवून खाली आणले. तब्बल तासभर चाललेल्या या नाट्याचे कारण समजताच उपस्थितांना मात्र हसू आवरेनासे झाले होते.
या तरुणाला समुपदेशन करुन खाली आणणाऱ्या जावेद खान (शिवसेना विभागप्रमुख कॅन्टोमेंट, उम्मत सामाजिक संस्था अध्यक्ष) यांनी सांगितले, मी सहकारी इरफानभाई, शरीफभाई, वासिमभाई , इम्रानभाई , यांना सोबत घेऊन चाललो असता वाडीया महाविद्यालयाच्या चौकात खूप गर्दी दिसली.
दोन अग्निशामक दलाच्या गाड्या पोलिस आणि नागरिक जमा झाले होते. चौकशी केली असता एक तरुण मोठ्या झाडावर चढला होता आणि आत्महत्येचा प्रयत्न करत होता. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान वाचवतील असा विचार करुन मी पुढे निघालो. दरम्यान बंडगार्डन चौकात मेट्रो रेल्वेच्या कामाला आलेली एक भली मोठी 80 फूट उंच क्रेन दिसली.
माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला आणि मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना क्रेन देण्याची विनंती केली. चालक सुजित यादव याला क्रेन सहित घेऊन घटनास्थळी पोहोचलो. क्रेन वाडिया कॉलेजच्या आवारात घेण्यात आली आणि पोलीस व अग्निशमप दलाच्या मदतीने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. क्रेन वरती गेल्यावर संवाद साधत तरुणाला नाव विचारले असता, त्याने उस्मान सैय्यद असे सांगितले.
तर आत्महत्या का करतोय हे विचारले असता प्रेयसी आणि आईतील वादामुळे आत्महत्या करतोय असे बोलला. त्याला बोलते ठेवत त्याच्या आईचा नंबर घेऊन व्हिडिओ कॉल केला. मात्र आईचे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. त्याच्या आईने त्याच्या प्रेयसीचा नंबर तिने दिला. तिला कॉल करता त्यांच्यातले रुसवे फुगवे सुरु झाले.
मात्र तरही तो झाडावरुन खाली उतरण्यास तयार नव्हता. अखेर बोलता बोलता त्याने सिगरेट मागीतली. सिगरेटसाठी त्याने हाथ पुढे करताच त्याचा हाथ पकडून ठेवला. यानंतर त्याची समजूत घालून त्याला जवळच्या फांदीवरुन क्रेनच्या बकेटमध्ये बसवण्यात आले. याप्रकारे तासाभराच्या नाट्यानंतर तरुणाचा जीव वाचवण्यात यश आले