नवी दिल्ली – दबंग अधिकारी म्हणून नेहमीच ias, ips अधिकाऱ्यांचे नाव चर्चेत असतात. त्याबरोबर त्यांची चर्चा त्यांचा साधेपणामुळेही दिसून येते. त्यांच्या साधेपणाची चर्चा नेहमीच सोशलवर होत असते. अशीच साधेपणाची चर्चा उत्तरप्रदेशच्या परिवहन विभागात विशेष सचिव असलेले डॉ. अखिलेश मिश्रा यांची होत आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये डॉ. अखिलेश मिश्रा चक्क रस्त्यावर बसून भाजीपाला विकलाय. त्यांचा भाजी विकतानाचा फोटो त्यांच्या एका मित्रानं सोशल मीडियावर व्हायरल केला. एक IAS अधिकाऱ्यला रस्त्यावर भाजी विकताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. हा फोटो व्हायरल झाल्यावर याबाबत मिश्रा यांना विचारले असता त्या या मागिल कारण सांगितल.
ते म्हणाले,’मी काल मार्केटमध्ये गेलो होतो त्यावेळी तेथे एका भाजी विक्रेता आजीने मला तिच्या तिच्या दुकानावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ती म्हणाली थोड्या वेळात येते. म्हणून मी तिच्या दुकानात बसलो असताना मित्रानं माझा फोटो काढला आणि पोस्ट केला, अशी माहिती त्यांनी दिली.