मुंबई – आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ ‘दगडी चाळ’, ‘झकास’, ‘बस स्टॉप’, ‘निळकंठ मास्तर’, ‘सतरंगी रे..’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री ‘पूजा सावंत’चा आज म्हणजेच, दि. २५ जानेवारीला वाढदिवस आहे.
View this post on Instagram
पूजाने अगदी कमी कालावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, कलाविश्वात पूजा सावंतची आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते. पूजाने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या हॉट अँड स्टनिंग लूकने पूजाने अनेक अभिनेत्रींना मागे टाकले आहे.
View this post on Instagram
पूजाचे बालपण मुंबईत गेले. बालमोहन विद्यालय या शाळेत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातून विज्ञान शाखेसाठी पूजाने प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानाच तिला नृत्य आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजमधील अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला. पण अभिनयात तिला करियर करायचे नव्हते. पूजाला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. प्राण्यांची सेवा करायची आवड तिला होती.
View this post on Instagram
‘लपाछपी’ या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास पात्र ठरला. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल तिला ‘दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. सध्या, पूजा ‘महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर’ या शोचे परिक्षण करत आहे.
View this post on Instagram
पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्स पर्यंत पोहचवत शेअर करत असते. तिच्या या फोटोंवर फॅन्स लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.
View this post on Instagram