नवी दिल्ली : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये चांगली कामगिरी बजावलेला युवराज सिंग सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. या वेळी चर्चेचे कारण ठरला आहे युवराजचा नवा लुक.
View this post on Instagram
टीम इंडियाच्या या माजी ऑलराउंडर खेळाडूने त्याचा लांबलचक केसांच्या नवीन हेअरस्टाईल मधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
त्याने शेअर केलेल्या फोटोत तो नव्या हेअरस्टाईलिस्टमध्ये दिसून येत आहे, युवराजचे या नव्या लुक मधील फोटो आल्यावर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. लाखोंच्या घरात त्याचा या लुकला पसंती मिळत आहे.
View this post on Instagram
त्यांचा या फोटो ला क्रिकेटर शिखर धवन, इरफान पठाण यांचासह बॉलीवूड सेलेब्सने सुद्धा लाईक केले आहे. युवराजने इंडिया लीजंट कडून खेळताना ६ डावात १९४ धावा काढल्या असून त्यात द.आफ्रिका आणि वेस्टइंडीज विरुध्द ओवर मध्ये चार चार षटकार ठोकले आहेत.