पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण प्रवेशासाठी मुदतवाढ

एका महिन्यात ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी नावनोंदणी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेतर्फे (open learning school) चालवण्यात येणाऱ्या दूरस्थ शिक्षण (distance education) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात अली आहे. आतापर्यंत ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नावनोंदणी केली असून, या प्रतिसादामुळेच अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची मुदत आता १५ ऑक्टोबर २०१९ पर्यंत वाढविणयात आलीअसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे.

विद्यापीठातर्फे या वर्षापासून दूरस्थ अभ्याक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांची प्रवेशप्रक्रिया २७ ऑगस्टपासून सुरू झाली. ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. मात्र, या काळात विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढविण्यात आली आहे. आता विद्यार्थी अशा अभ्यासक्रमांसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेऊ शकतील. त्यासाठी कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. मुक्त अध्ययन प्रशालेच्या  संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेता येतील, अशी माहिती संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.