मुबई – भारतीय महिला क्रिकेट टीमचं टी २० वर्ल्ड कप जिंकण्याचा स्वप्न अर्धवट राहील आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय टीमला पराभवाचा सामना करावा लागला. हनप्रीतने शर्थीचे प्रयत्न करत सर्वाधिक 52 धावा केल्या. हनप्रीत रणआऊट झाल्याने अनेक भारतीयांची मने तुटली. जर हनप्रीत आऊट झाली नसती तर कदाचित भारतीय टीमला विजयाची संधी होती अशा भावना अनेकांनी सोशल मीडियावरून व्यक्त केल्या. हनप्रीतचा रणआऊटचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे अनेकांना भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची देखील आठवण येत आहे.
भारताला विजयासाठी 173 धावांच आव्हान ऑस्ट्रेलियाकडून मिळालं होत.त्याचा पाठलाग करताना शेफाली वर्मा, स्मृती मांधना आणि यास्तिका भाटिया लवकर बाद झाल्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत कौरने दमदार खेळी केली. हनप्रीत रणआऊट झाल्याने भारताला अवघ्या पाच रन्सनं पराभवाचा सामना करावा लागला.
क्रीझमध्ये बॅट रुतून बसल्यामुळे हनप्रीत वेळेत लाईन पार करू शकली नाही. सेट झालेल्या हनप्रीतला तंबूत परतावे लागले यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर असाच प्रकार महरेंद्रसिंह धोनीसोबत घडला होता.
View this post on Instagram
हनप्रीत आऊट झाल्यानंतर चाहत्यांना देखील धोनीची आठवण झाली. आयसीसीने धोनी आणि हनप्रितच्या रनआऊटचा एकत्रित व्हिडीओ शेअर केला आहे. जो सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यामध्ये धोनी देखील अशाच काहीशा प्रकारे रणआऊट झाल्याचं पाहायला मिळत. ‘या’ रणआऊटमुळे अनेकांची मने तुटली’ अशा कॅप्शनखाली दोन्हही व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत.