हरमान बावेजा आणि साशा रामचंदानी यांच्या विवाहाची जोरात तयारी सुरू आहे. या दोघांचा साखरपुडा डिसेंबरमध्येच झाला होता. आता त्यांच्या विवाहाच्या आगोदरच्या समारंभांना सेलिब्रिटीजनी हजेरी लावून मस्त धमाल उडवून दिली आहे.
विवाहानिमित्त आगोदर दिलेल्या कॉकटेल पार्टीला शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, आमिर अली, आशिष चौधरी आणि इतर सेलिब्रिटीज उपस्थित होते, असे सोशल मिडीयावर पोस्ट फोटोमध्ये दिसते आहे. एका अन्य व्हिडीओमध्ये हरमान बावेजाही इतर मित्रमंडळींबरोबर डान्स करताना दिसतो आहे. साशा रामचंदानी ही न्युट्रीशन हेल्थ कोच आहे. हरमान बावेजाने प्रियांका चोप्राबरोबर “लव्ह स्टोरी 2050’मधून पदार्पण केले होते.
मात्र हा सिनेमा सपशेल आपटला होता. त्यानंतर “व्हिक्टरी’,”व्हॉट्स युवर राशी ?’ या सारख्या सिनेमातूनही त्याने काम केले होते. मात्र हे सिनेमेही फारसे काही चालले नव्हते. 2014 पासून हरमान एकदम गायब झाला होता.
मात्र साशा रामचंदानीबरोबर तो एक हॉएलमध्ये दिसला. तेंव्हा त्याने आपले वजन खूपच कमी केलेले होते. त्यामुळे तो ओळखूही येत नव्हता. आता लग्नानंतर तो काय करतो ते बघूया.