मराठी नव्या वर्षाचा पहिला दिवस, साडे तीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा एकमेकांना देत आहेत. अशातच गुढीपाडव्याला संक्रांतीच्या शुभेच्छा देणाऱ्या भूमी पेडणेकर या अभिनेत्रीला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. पारंपरिक वेशातला फोटो शेअर करत भूमीने ट्विटरवरून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या शुभेच्छा देताना तिने कॅप्शनमध्ये ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असं लिहिलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे.
तिल गुड घ्या,गोड़ गोड़ बोला ?#HappyGudiPadwa #GoodMorning #marathimulghi #happynewyear pic.twitter.com/neYA8Z0fgt
— bhumi pednekar (@bhumipednekar) April 6, 2019