नगर -नगर शहरात विविध भागमध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाची उत्साहात तयारी करण्यात आली आहे. विविध चर्चावर रोषणाई करण्यात आली आहे. तर, खिस्ती बांधवांनी घरोघरांवर विद्युत रोषणाई केली आहे.
नगर शहरातमध्ये ह्यूममेमोरिअल चर्च, पहिली मंडळी चर्च, अहमदनगर पहिली मंडळी चर्च, क्राईस चर्च भिंगार, सेंट जेव्हिअर चर्च तारकपूर, सेंट अण्णा चर्च, बूथ हॉस्पिटल चर्च, कोकराची पहिली मंडळी चर्च, डॉन बॉस्को चर्च आदी चर्चमध्ये खिस्त जन्मोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. उद्या दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बूथ हॉस्पिटलमधील शर्ली मिलर हॉलमध्ये प्रार्थना :
बूथ हॉस्पिटलमधील “शर्ली मिलर हॉल- प्रार्थना स्थळ’ मध्ये सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना करण्यात आली. यामध्ये चर्चचे पाळक मेजर रवींद्र कांबळे, अरूण बळीद, दिनेश आढाव, राजेंद्र कळकुंबे, सचिन साळवे, प्रवीण कांबळे, दीपक तेलधुने, सुशांत चक्रनारायण, इम्मानुएल वाघमारे, डॅनियल साळवे, संतोष फासे, प्रार्थना आढाव, रुबेन साळवे, बिपीन गायकवाड आदी उपस्थित होते.
बॉईज हायस्कूल येथे शुभ्रदान देणगी उपासना
मराठी मिशन संचलित अहमदनगर बॉईज हायस्कूल येथे शुभ्रदान देणगी उपासना व ख्रिस्त जन्मोत्सव सोहळानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास रेव्ह. सुनील भांबळ यांनी ख्रिस्तजयंती उपासना घेतली व येशूच्या जन्माचे महत्त्व सांगितले. यावेळी विशाल पटेकर, चार्लिन गायकवाड, श्याम खरात, हर्षल जाधव, सुमित ढगे, रॉनी ठोंबरे, प्रशांत वाघमारे, रोहन भोसले, सचिन कांबळे, सुशीलाताई सूर्यवंशी, मोनाताई सूर्यवंशी, आशिष चांदेकर, रॉनी क्षेत्रे, मास्टर शारोन आदी उपस्थित होते.
“देवाचे सामर्थ्य जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ’
भारता हा विविध जाती-धर्माने, संस्कृतीने व परंपरेने नटलेला देश आहे. ख्रिस्ती धर्मातील देव माणसामध्ये आला आहे. देवाचे सामर्थ्य हेच या जगाच्या पाठीवर श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन नाशिक धर्म प्रांत रेव्ह.शरद गायकवाड यांनी व्यक्त केले. अहमदनगर पहिली मंडळी चर्चचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करून उपस्थितांना रेव्ह.शरद गायकवाड यांनी संदेश दिला यावेळी रेव्ह. मेघना गायकवाड आचार्य रेव्ह जनार्दन वाघमारे आदी उपस्थित होते.
प्रभू येसू ख्रिस्तांनी सर्व मानव जातीला प्रेमाचा संदेश दिला. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांवर प्रेम केले पाहिजे. या प्रेमाच्या संदेशाचा जागर होणे अपेक्षित आहे.
– मेजर देवदान कळकुंभे, प्रशासक बूथ हॉस्पिटल