एव्हरग्रीन अभिनेते ‘अनुपम खेर’ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई – 1984 साली ‘सारांश’ चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात करणारे अभिनेते ‘अनुपम खेर’ यांचा आज (7 मार्च) वाढदिवस. विविध भूमिकांमधून अनुपम खेर यांनी प्रेक्षकांच्या मनात प्रेमाचे घर निर्माण केले आहे.

 

View this post on Instagram

 

It is my birthday today!! 7th March. A day to celebrate by thanking some important people of my life. You can wish me too. Jai Ho!! ???

A post shared by Anupam Kher (@anupampkher) on

7 मार्च 1955 साली शिमल्यातील एका काश्मिरी पंडित कुटुंबात अनुपम यांचा जन्म झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेता बनण्याच्या इच्छेने अनुपम खेर मुंबईत आले. अनुपम यांनी आपल्या बहारदार अभिनयाच्या जोरावर कलाक्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उठवला आहे.

1989 मध्ये आलेल्या ‘राम लखन’ चित्रपटासाठी अनुपम खेर यांना फिल्मफेयर पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पाच वेळा ‘फिल्मफेयर अवॉर्ड फॉर बेस्ट कॉमेडियन’चा किताबही अनुपम यांनी पटकावला. याशिवाय त्यांना 2014 साली पद्मश्री पुरस्कार तर 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अनुपम खेर यांनी अभिनेत्री किरण खेरशी विवाह केला. अनुपमसोबत किरण यांनी दुसरा विवाह केला. दोघांची चंडीगढमध्ये भेट झाली. त्यानंतर त्याच वर्षी 1985 मध्ये अनुपम खेर आणि किरण लग्नबंधनात अडकले.

 

View this post on Instagram

 

Just like that!! बस ऐसे ही !! 🙂

A post shared by Anupam Kher (@anupampkher) on

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.