नवी दिल्ली – रशिया-युक्रेन युद्धाची गडद छाया संपूर्ण जगावर पसरली असताना आता याचा परिणाम जगभरातील 193 पेक्षा जास्त देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अमेरिकेसह युरोपीय राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. आणि आता याचा मोठा फटका जवळपास जगातील सर्वच देशांना बसत असल्याचे दिसून येत आहे. रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असून, आता रशियावर निर्बंध लादण्यानत आल्याने परिणामी कच्च्या तेलाचा होणार पुरवठा ठप्प झाला आहे. आणि त्यामुळे कच्च्या तेलाचे दर आता 130 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. दरम्यान, ही परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या काळात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होणार हे नक्कीच.