मुंबई – मुंबई शेअर बाजारामध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त झालेल्या मुहुर्ताच्या विशेष व्यवहाराच्यावेळी अर्ध्या टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 354 अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 65 हजार 259 अंकांवर गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 100 अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 19 हजार 525 अंकांवर गेला.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने होणारे एक तासाचे प्रतिकात्मक ट्रेडिंग सत्र शेअर बाजारामध्ये महत्वाचे मानले जाते. दिवाळी हा हिंदू सण गुंतवणुकीसह नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो.
मुहुर्ताच्या सत्रासाठी मुंबई शेअर बाजाराचे अध्यक्ष एस. मुंद्रा, “बीएसई’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदररामण राममूर्ती आणि एल ऍन्ड टी फायनान्स होल्डिंगचे व्यवस्तापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी दीनानाथ दुभाषी हे उपस्थित होते.