स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच आपले केस प्रिय असतात आणि स्त्रियांचे सौंदर्य काळेभोर घनदाट लांबसडक केसांमुळे आणखीनच खुलून दिसते. सुदृढ केस प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात, पण काही कारणांमुळे हेअर फॉल म्हणजे केस गळायला सुरुवात होते आणि बघता बघता ही समस्या वाढत जाते. दैनंदिन जीवनात हेअर फॉलच्या समस्या कमी-जास्त प्रमाणात प्रत्येकालाच उद्भवतात.
केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. आपल्या शरीरातील अन् बॅलन्स हार्मोन्समुळे किंवा स्ट्रेस, जास्त विचार, आहारात व्हिटॅमिन सी कमतरता किंवा शारीरिक, मानसिक काही आजारही कारणीभूत ठरतात. एखाद्या आजारावर औषध उपचार सुरू असतानाही केस गळायला लागतात. स्त्री आणि पुरुषांमध्ये केस गळण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. पुरुषांमध्ये जेनेटिक, अनुवंशिकतादेखील केस गळण्याचे कारण असू शकते. ( Hair Fall , Arogya Jagar, diet , आरोग्य ,आहार )
स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर हार्मोन चेंजमुळे केस गळायला लागतात. मेनॉपॉझ, थायरॉईड, रक्ताची कमतरता, चुकीचा आहार यामुळे तसेच कधी कधी पाण्यामुळेही केस गळतात. हार्ड वॉटर अर्थात बोअरिंगचे पाणी किंवा पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त असणे ही त्यामागील कारणे असतात. ( Hair Fall , Arogya Jagar, diet , आरोग्य ,आहार )
केस गळण्याचे प्रमाण अति प्रमाणात वाढल्यामुळे आपण घाबरून जातो व घरगुती उपाय करायला लागतो. पण असे करू नये. यामुळे केसांच्या समस्या आणखीनच वाढू शकतात. केस गळण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार पद्धती चालू कराव्यात.
अशी घ्या काळजी…
वेळेवर झोपावे.
केस धुताना केमिकल फ्री शाम्पू वापरावे
आठवड्यातून तीन वेळा केस धुवावेत.
केस मुलायम व चमकदार राहण्यासाठी ब्रॅंडेड कंडिशनरचा वापर करावा.
त्वचा ड्राय असल्यास कोकोनट ऑइलने हेड मसाज करावा.
केसांसाठी आयुर्वेदिक हेडपॅकचा वापर करावा.
स्वच्छ कोमट पाण्याने केस धुवावेत. ( Hair Fall , Arogya Jagar, diet , आरोग्य ,आहार )
रोजच्या आहारात फ्रुट ज्यूस, स्प्राऊट, सोया बदाम, हिरव्या पालेभाज्यांचा नियमित समावेश करावा.
व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे केसांना मजबूत बनवतात. केरोटीनपासून आपले केस बनतात. आपल्या केसांसाठी हे महत्त्वाचे घटक असतात. केस उत्तम राहण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीनची आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी 12, फॉलिक ऍसिड, आयर्न, झिंक हे घटक शरीरात रक्त वाढवण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचतो. त्यामुळे केस गळणे कमी होते तसेच केस लवकर सफेद होत नाहीत.
मार्केटमध्ये या घटकांपासून बनवलेले अनेक प्रकारचे मेडिसिन्स उपलब्ध आहेत. पण नंतर अशा गोष्टींची सवय लावून घेऊ नये. केस गळणे थांबल्यावर अशा मेडिसिन्स बंद कराव्यात. आहारात आवळे अंडी, मासे, डाळ आणि दही अशा पदार्थांचे सेवन करावे.
डोक्याच्या स्काल्पच्या काही भागावर केस मुळासकट नष्ट झाले असतील तर अशावेळी एकच उपाय असतो आणि तो म्हणजे हेअर ट्रान्सपरंट करणे. शक्यतो हेअर ट्रान्सपरंट त्वचारोग तज्ज्ञ किंवा अनुभवी सर्जनकडूनच करावे. ( Hair Fall , Arogya Jagar, diet , आरोग्य ,आहार )