मुंबई – भारताची अव्वल जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकरला फेडरेशन इंटरनॅशनल डी जिम्नॅस्टिक (एफआयडी) आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संस्थेने मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संस्थेने करमरकरला निलंबित म्हणून चिन्हांकित केले आहे. परंतु याविषयी दीपाला कोणतीही माहिती किंवा कारण देण्यात आलेले नाही.
सध्या दीपा कर्माकर आगरतळा येथे आहेत. या प्रकरणावर प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी म्हणाल्या, दीपा सध्या आगरतळा येथे आहे. कारण ती राष्ट्रीय शिबिराचा भाग नाही. आपल्या सर्वांप्रमाणेच तिलाही या गोष्टीचा धक्का बसला आहे. एफआयडीकडून असा कोणताही संवाद नसताना आंतरराष्ट्रीय महासंघाने तिला “निलंबित’ म्हणून का चिन्हांकित केले आहे, हे आम्ही सर्वजण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.