मनोरंजन क्षेत्रातून दुख:द बातमी समोर आली आहे. गली बॉय फेम रॅपर धर्मेश परमार उर्फ MC Tod Fod याचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले आहे. धर्मेशच्या मृत्यूची माहिती त्याच्या ‘स्वदेशी मूव्हमेंट’ या बँडने सोशल मीडियावर दिली. धर्मेशचा मृत्यू कशामुळे झाला, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
MC Tod Fod या नावाने प्रसिद्ध असलेला धर्मेश हा एक लोकप्रिय स्ट्रीट रॅपर होता जो त्याच्या गुजराती गीतांसाठी ओळखला जातो. रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट गली बॉय मधील त्याच्या इंडिया 91 या साउंडट्रॅकसह त्याने बॉलीवूडमध्ये एक स्थान निर्माण केले होते.
रॅपरने अवघ्या 24 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इतक्या लहान वयात त्याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने रॅपरच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. धर्मेश परमार आता या जगात नाही यावर चाहत्यांना विश्वास बसत नाही आहे. अभिनेता रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी, झोया अख्तर यांनीही धर्मेशच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.