यवत :- यवत पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवार (दि.२२)रोजी यवत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे. पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या सूचनेवरून हा कार्यक्रम सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. यात तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर
अभीनव देशमुख यांच्या सूचनेनुसार गुरुवार (दि.२२) तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर यवत पोलिस स्टेशनमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांनी पोलीस स्टेशनकडे तक्रार अर्ज केलेले असतील तसेच नागरिकांच्या कोणत्याही दखलपात्र वा अदखलपात्र, तक्रारी अर्ज, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी असतील तर त्या नागरिकांनी गुरुवारी (दि.२२) रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत यवत पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.