पुणे: जनावरांची चोरी करणारी अट्टल टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जनावरांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारी पिकअप हस्तगत केली. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहे.

दिनांक 3 मे रोजी कोव्हिड लॉकडाऊनचे अनुषंगाने पुणे सोलापुर हायवेवर पेट्रोलींग करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला खबर मिळाली की, यवत पोलिस स्टेशन हद्दीतील बोरी पारधी येथील शेळ्यांची चोरी करणारे चौफुला सुपा रोडवरील कॅनॉलवर आले आहेत. त्याप्रमाणे सदर ठिकाणी सापळा लावून ताब्यात घेतले.

भरत शिवाजी जाधव (27 रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड जि. पुणे ) अमोल शिरशु माने (22 रा.लोणी भापकर ता.बारामती जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचेकडे अधिक चौकशी केली त्यांनी हे नमूद महादेव तानाजी जाधव हनुमंत रमेश जाधव अनिल अशोक माने अंकुश शिवाजी जाधव राहुल जालिंदर माने सर्व रा.केडगाव टोलनाका ता.दौंड ), रामदास माने (रा.मुरटी ता.बारामती जि. पुणे ) अविनाश संजय ठोंबरे (रा.लोणी भापकर ता.बारामती ) यांच्या मदतीने केले. त्यांनी यवत पोलीस ठाण्यात चार, बारामती व सासवड पोलीस ठाण्यात प्रत्येकी 1 गुन्हा केला.

आरोपी भरत शिवाजी जाधव व अमोल शिरशु माने याचे ताब्यातून गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेले बोलेरो पिकअप व 1 बिगर नंबरची ऍक्‍टिव्ह असा एकूण 11 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करणात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अदिक्षक मिलिंद मोहिते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शिवाजी ननवरे,अमोल गोरे, अनिल काळे,रविराज कोकरे, हनुमंत पासलकर, प विजय कांचन, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके,धीरज जाधव,अक्षय जावळे,दगडू वी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.