मोरगांव : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या परीपत्रकानुसार पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभीनव देशमुख यांनी दि. ९ रोजी तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला आहे .
यानिमित्ताने पोलीस स्टेशनकडे प्रलंबीत असलेले अर्ज प्रकरणे कामाचा निपटरा केला जाणार आहे . यामध्ये जिल्ह्यात बारामती तालुक्यातील ३ पोलीस स्टेशनसहीत इतर १६ पोलीस स्टेशनचा समावेश आहे .
कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला नव्हता. यामुळे पोलीस स्टेशन हद्दीत पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक डॉ . अभीनव देशमुख यांनी उद्या गुरुवार दि .९ रोजी हा दिन साजरा करुन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यास सांगितले आहे. यासाठी संबंधीत अर्जदार , गैरअर्जदार यांनी कागदपत्रासहीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे .
उद्या बारामती शहर , बारामती तालुका , वडगांव निंबाळकर ,घोडेगाव , मंचर, आळेफाटा , ओतूर, भिगवण , वालचंदनगर , सासवड, लोणावळा शहर,लोणावळा ग्रामीण, जुन्नर , नारायणगाव , खेड , मंचर , हवेली , दौंड , यवत याठिकाणी हा दिन साजरा केला केला जाणार आहे . तक्रार निवारण दिनी वरिष्ठ अधिकारी , दुय्यम अधिकारी , पोलीस अंमलदार उपस्थित राहणार आहेत .