कराड -शिवनगर, ता. कराड येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप, विद्या जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, कराड तालुका साखर कामगार संघाचे अध्यक्ष एम. के. कापूरकर यांची उपस्थिती होती.
कृष्णा कारखान्याच्या वाटचालीत थोर विचारवंत यशवंतराव मोहिते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी शेतकरी वर्गाला सोप्या भाषेत शेतीचे अर्थकारण शिकवले. सामाजिक न्यायाला त्यांनी नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांच्यासोबत काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.