नगर -दोन लाखापेक्षा जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतून वगळले आहे. तसेच खाजगी शाळांतील कर्मचारी नियमावली मधील मसुद्याला बदलण्याची अधिसूचना जारी करण्यात आली.
10 जुलै रोजी जारी केलेल्या या अधिसूचनेमुळे पूर्वी नियुक्ती असलेले विना अनुदानावर काम करणारे, अंशतः काम करणारे लाखो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुन्या पेन्शन योजनेमधून बाहेर काढण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप शिक्षक भारतीचे सुनिल गाडगे यांनी केला आहे.