अहमदनगर – भिंगार नाला परिसरात सुगंधी तंबाखूसह ६.३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एक जण पसार आहे.
उमेश शामलाल मालपाणी ( वय ३१, रा. वावरेचाळ, मनमाड, ता. नांदगांव, जि. नाशिक), सुभाष अशोक बोर्डे (वय २७, रा. भाऊसिंगपुरा, साईनगर, लालमाती, जि. छत्रपती संभाजीनगर), शुभम रंगनाथ टाले (वय २३, रा. इसोली, ता.
चिखली, जि. बुलढाणा), मयुर रतन चाबुकस्वार (वय ३०, रा. ब्राम्हणगल्ली, माळीवाडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर तंबाखू जितेंद्र नरेंद्र चांडक ऊर्फ मालपाणी (रा. लवेंडर सोसायटी, जि. छत्रपती संभाजीनगर) याची असून त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र चांडक ऊर्फ मालपाणी हा त्याचा हस्तक उमेश शामलाल मालपाणी याच्यामार्फत टेम्पोमधून सुगंधी तंबाखू विक्रीसाठी भिंगार नाला परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना मिळाली.