IPL 2024 Awards List : फायनलनंतर पडला पुरस्कारांचा पाऊस, ‘या’ खेळाडूंनी मारली बाजी, पहा संपूर्ण Awards ची यादी एका क्लिकवर..

IPL 2024 Awards List : आयपीएल 2024 चा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. कोलकाता संघाने हा सामना 8 गडी राखून जिंकला आणि 17 व्या हंगामातील चॅम्पियन संघ बनला. यासह, आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला 20 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 12.50 कोटी रुपये बक्षीस मिळाले.
याशिवाय ऑरेंज कॅप, पर्पल कॅप आणि इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन असे अनेक पुरस्कार देण्यात आले, तर चला जाणून घेऊया कोणत्या खेळाडूने कोणता पुरस्कार जिंकला.
‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले वर्चस्व….
सनरायझर्स हैदराबादचा स्टार अष्टपैलू नितीश रेड्डी या वेळी उदयोन्मुख खेळाडू (Emerging Player of the Season) म्हणून निवडला गेला. त्याला 10 लाख रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. या मोसमात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या अभिषेक शर्माला सुपर सिक्सर ऑफ द सीझन (Super Sixes in the Match) म्हणून निवडण्यात आले. इलेक्ट्रिक स्ट्रायकर ऑफ द सीझनचा पुरस्कार दिल्ली कॅपिटल्सच्या जॅक फ्रेझर मॅग्राकने जिंकला. याशिवाय ऑरेंज कॅप पुन्हा एकदा विराट कोहलीकडे गेली तर हर्षल पटेलने पर्पल कॅप मिळवली.
विजेता – कोलकाता नाइट रायडर्स – 20 कोटी रुपये आणि ट्रॉफी
उपविजेता – सनरायझर्स हैदराबाद- 12.5 कोटी रुपये आणि ट्रॉफी
Sunrisers Fairplay award Winner IPL 2024! pic.twitter.com/t6fT5CUk2k
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) May 26, 2024
सीझनचा उदयोन्मुख खेळाडू (इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीजन) – नितीश रेड्डी (रु. 10 लाख आणि ट्रॉफी)
फेयरप्ले अवॉर्ड – सनरायझर्स हैदराबाद (रु. 10 लाख आणि ट्रॉफी)
ड्रीम11 गेमचेंजर ऑफ द सीजन – हर्षल पटेल – 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
सुपर सिक्सेस ऑफ सीजन- अभिषेक शर्मा – 10 लाख रूपये
परफेक्ट कैच ऑफ द सीजन – रमनदीप सिंह – 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
Runner up: SRH
Fair Play award: SRH
Best pitch & ground: Hyderabad
Most sixes: Abhishek Sharma
Most fours: Travis Head
Emerging Player: Nitish Kumar ReddyA Proud season for Orange Army 🧡 from 10th in IPL 2023 to making a strong comeback & qualifying into final in IPL 2024. pic.twitter.com/kwAOb3xJtj
— SunRisers OrangeArmy Official (@srhfansofficial) May 27, 2024
इलेक्ट्रिक स्ट्राइकर ऑफ द सीजन- जॅक फ्रेझर मॅग्राक – 10 लाख रुपए आणि ट्रॉफी
क्रेड पावर प्लेयर ऑफ द सीजन – वेंकटेश अय्यर- 10 लाख रुपए आणि ट्रॉफी
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट)- हर्षल पटेल (24 विकेट)- 10 लाख रुपए आणि पर्पल कॅप
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा)- विराट कोहली (741 रन)- 10 लाख रुपए आणि ऑरेंज कॅप
मोस्ट वैल्यूएबल प्लेयर ऑफ द सीजन – सुनील नरेन – 10 लाख रुपये आणि ट्रॉफी
पिच एंड ग्राउंड अवॉर्ड – राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद ( 50 लाख रुपये)
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा
• विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)- 741 धावा
• ऋतुराज गायकवाड़ (चेन्नई सुपर किंग्स) – 583 धावा
• रियान पराग (राजस्थान रॉयल्स)- 573 धावा
• ट्रेविस हेड (सनराइ़जर्स हैदराबाद)- 567 धावा
• संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)- 531 धावा
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट
• हर्षल पटेल (पंजाब किंग्स) – 24 विकेट
• वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाइट रायडर्स) – 21 विकेट
• जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) – 20 विकेट
• आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स) – 19 विकेट
• हर्षित राणा (कोलकाता नाइट रायडर्स) – 19 विकेट
प्लेऑफमध्ये पोहोचलेले संघही झाले मालामाल
आयपीएल 2024 पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या स्थानावर राहिले. या दोन्ही संघांवरही पैशांचा पाऊसही पडला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संजू सॅमसनच्या संघाला 7 कोटी रुपये, तर चौथ्या स्थानावर असलेल्या आरसीबीला 6.5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली.





