“द कपिल शर्मा शो’चा पुन्हा रामराम

“कॉमेडी नाईट्‌स विथ कपिल’ असो की सध्या सुरू असलेला “द कपिल शर्मा शो’ असो, प्रत्येक शोच्या माध्यमातून विनोदवीर कपिल शर्माने कायमच चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणत आपली वेगळी छाप उमटवली आहे. पण हा विनोदवीर आता काही काळासाठी चाहत्यांचा निरोप घेणार आहे. येत्या काही दिवसांत “द कपिल शर्मा शो’ हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांपासून दुरावणार आहे.

जरी हा कार्यक्रम पुढील महिन्यात बंद होणार असला तरी यामागची कारणे चर्चेचा विषय ठरत आहेत. अतिशय महत्त्वाच्या कारणांचा आढावा आणि निरिक्षणानंतर निर्मिती संस्था आणि वाहिनीने हा कार्यक्रम काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कपिल शर्माच्या सूत्रसंचालनात साकारला जाणाऱ्या या कार्यक्रमातून किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह, अर्चना पूरण सिंह असे कलाकारही झळकतात. पण, फेब्रुवारी महिन्यापासून हे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत. 2018 मध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाला दमदार कामगिरीनंतर आता काही काळासाठी अल्पविराम मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.