नवी दिल्ली – दिल्ली सराफत आज सोन्याचा भाव त्यांचे 303 रुपयांनी कमी होऊन 50,290 रुपये ते दहा ग्रॅम झाला. मात्र चांदीचा दर 27 रुपयांनी वाढून 57,457 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,689 डॉलर व चांदीचा दर 19.50 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
रुपया घसरूनही जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे भारतीय सराफात सोन्याचे दर कमी झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. अमेरिका आक्रमक व्याजदर वाढ करणार असल्यामुळे डॉलर वधारत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता जागतिक गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे सोन्याची खरेदी कमी होत आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे असे त्यांनी सांगितले.