पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रची तड़जोडीसाठी पात्र असलेली थकित कर्ज प्रकरणे सोडवून जलद कर्जवसूलीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व शाखा व विभागीय कार्यालयांसाठी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी केले आहे.
सदरील विशेष लोकन्यायालय हे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे पुणे शहर विभागीय कार्यालय: “यशोमंगल, 1183/अ, फर्गसन महाविद्यालय रोड, शिवाजीनगर, पुणे येथे मुख्य जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष संजय देशमुख व पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव एम डी कश्यप यांच्या विशेष उपस्थितीत व बॅंकेचे कार्यकारी निर्देशक ए. बी. विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले जाणार आहे.
बॅंकेच्या वसूली व विधी विभागाचे सरव्यवस्थापक प्रशांत खटावकर, पुणे शहर अंचल प्रबंधक सरव्यवस्थापक राजेश कुमार सिंह, पुणे पश्चिम अंचल प्रबंधक राहुल वाघमारे आणि पुणे पूर्व अंचल प्रबंधक अभिजीत चंदा तसेच प्रधान कार्यालय येथून वसूली एसऐएमव्ही व विधी विभागातील कार्यकारी अधिकारी उपस्थित राहून कार्यवहन करतील. पुणे जिल्ह्यातील थकित कर्जदारानी नजीकच्या बॅंक क शाखेशी संपर्क करावा किंवा 020- 25614223 या क्रमांकावर संपर्क करावा.