नवी दिल्ली – धातू बाजारासह विविध जागतिक बाजारात कमालीची अस्थिरता आहे. मंगळवारी सोन्याचे दर 68 रुपयाने कमी होऊन 47,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
मात्र तयार चांदीचा दर 114 रुपयांनी वाढून 60,221 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,784 डॉलर व चांदीचा दर 22.23 डॉलर या पातळीवर राहिला. सोन्याचे दर जागतिक पातळीवर अस्थिर राहण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी व्यक्त केली.