Gold-Silver Price Today | सोन्याच्या दरात माफक ‘वाढ’; जाणून घ्या नवीन ‘दर’

जागतीक संकेतानुसार चांदीचा दरही वाढला

नवी दिल्ली, दि. 6– सध्या सोन्याचे दर बऱ्याच कमी पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदारांकडून खरेदी झाल्यामुळे सोन्याच्या दरात मंगळवारी मापक वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 83 रुपयांनी वाढून 45,049 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दिल्ली दराफात मंगळवारी चांदीचा दर 62 रुपयांनी वाढून 64,650 पन्नास रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,733 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 24.97 डॉलर प्रती औंस झाला. एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर डॉलर काही प्रमाणात कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या ज्यांना परवडते ते सोने खरेदी खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. कारण सोन्याचे दर बऱ्याच खालच्या पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी भारतामध्ये सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते.

आता ते 45 हजार रुपयांवर आले आहेत. करोनाचे रुग्ण वाढून आद्योगिक उत्पादनावर परिणाम होण्याची चिन्हे दिसून येऊ लागली तर सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असे बरेच विश्‍लेषक सूचित करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.