लग्न सुरु असताना समजलं वधु तर वराची हरवलेली बहिण, मग पुढे झाले असे काही…

पिचिंग –  चीनमध्ये एका विवाह सोहळ्यात अनोखी गोष्ट समोर आली. ज्या मुलीशी लग्न ठरलं होतं ती त्या मुलाची बहीण असल्याचे निष्पन्न झाले. या विवाह सोहळ्यात वधू आणि वर विवाहाचे विधी पूर्ण करत असताना वराच्या आईची नजर वधूच्या हातावर पडली आणि तिला धक्काच बसला.

ती मोठ्याने रडू लागली, कारण ती वधू म्हणजे या आईची लहानपणी हरवलेली मुलगी होती. म्हणजेच तिचे लग्न आपल्या भावाशी होणार होते पण आईच्या लक्षात ही गोष्ट आली.

चीनमधील झिअंगसू प्रांतातील सोचो येथे ही घटना घडली आहे. वधूच्या हातावरील जन्मखुणा बघून आईने त्या वधूच्या विद्यमान माता-पित्यां कडे चौकशी केली तेव्हा ही गोष्ट लक्षात आली की साधारण वीस वर्षांपूर्वी या माता-पित्यांनी या मुलीला दत्तक घेतले होते. मुलगी त्यांना एका रस्त्याच्या कडेला सापडली होती.

विवाह समारंभात ही गोष्ट लक्षात आल्याने आपले जैविक मातापिता सापडल्याने त्या मुलीलाही आनंद झाला. लग्न होण्याच्या आनंदापेक्षाहि माझे खरे आईबाप मला सापडले असल्याचे आनंद जास्त आहे, असे तिने म्हटले आहे.

अर्थात या घटनेतील खरा क्लायमॅक्स वेगळाच आहे. कारण मुळात या विवाह समारंभातील जो वर होता त्यालाही या आईने दत्तक घेतले होते. 29 वर्षापूर्वी जेव्हा तिची मुलगी हरवली होती तेव्हा तिने एका मुलाला दत्तक घेतले होते. योगायोगाने तिची सख्खी मुलगी आणि तिचा दत्तक मुलगा यांच्यात असे लग्न ठरले होते. या वधू आणि वराचे बहीण आणि भावाचे प्रत्यक्ष जैविक असे कोणतेही नाते नसल्याचे समोर आल्याने हा विवाह समारंभ व्यवस्थित पार पडला. कारण वधूची सख्खी आई आणि वधूचे दत्तक माता पिता यापैकी कोणालाच या विवाहाला आक्षेप नव्हता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.