नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचा दर 82 रुपयाने कमी होऊन 48,246 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दिल्ली सराफात चांदीचा दर 208 रुपयांनी कमी होऊन 65,594 रुपये प्रति किलो झाला. सकाळच्या सत्रात रुपयाच्या मूल्यात 12 पैशाची वाढ झाल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाला. सध्या सोन्याचे दर पाच महिन्याच्या उच्चांकी पातळीवर आहेत. आगामी काळात सोन्याचे दर सध्याच्या पातळीवर स्थिर राहतील किंवा वाढतील असे विश्लेषकांना वाटते.