नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचे दर केवळ दहा रुपयांनी कमी होऊन 46,673 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 230 रुपयांनी कमी होऊन 63,014 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यामुळे सोन्याचे दर आगामी काही काळ अस्थिर राहण्याची शक्यता जास्त आहे.