नवी दिल्ली – जागतीक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होण्याबरोबरच अमेरीकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्यातच या घडामोडीमुळे डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याकडे गुंतवणूक वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जातीक बाजारासह आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली.
महगाई वाढणार आहे, त्यामुळे महागाईपासून संरक्षण करण्यासाठीही सोन्याच्या खरेदीत वाढ होत असल्यामुळे सोन्याचे दर वाढले असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 570 रुपयांनी वाढून 47,155 रुपये प्रती दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 190 रुपयानी वाढून 62,145 रुपये प्रति किलो झाला.
सकाळच्या सत्रात रुपयाचे मुल्य कमी झाले होते. त्यामुळे सोन्याची आयात महागात पडते. जागतीक बजारात सोन्याचा दर वाढून 74.68 डॉलर तर चांदीचा दर 23.70 डॉलर प्रती औंस इतका झाला. एचडीएफसी सेक्युरीटीजचे विश्लेषक तपन पटेल यानी सांगितले की, करोनामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यामुळे सोन्याच्या सुरक्षित गुंतवणूकीकडे लोक वळू लागले असल्याचे वातावरण आहे.