नवी दिल्ली – कालच्याप्रमाणे बुधवारीही भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचे दर 215 रुपयांनी वाढून 49,059 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेले.
त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचा ( Silver price today ) दर 1,185 रुपयांनी वाढून 64,822 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारातही सोन्याचे दर ( gold price today ) वाढून 1,854 डॉलर प्रति औंस झाले.
कालपासून वाढत असलेल्या सोन्याच्या दराबाबत ( gold price today ) एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत पत धोरणाबाबत काय निर्णय होईल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. त्यामुळे लघु मुदतीत सोने खरेदी वाढली आहे. अमेरिकेत नवे पॅकेज देण्याची शक्यता वाढल्यामुळे डॉलरच्या किमतीवर दबाव येऊन सोन्याची मागणी वाढत असल्याचे दिसून येते.
त्याचबरोबर भारतात रुपयाचा भाव वधारल्यानंतर सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होते. कारण भारतात बहुतांश सोने आयात करतो. रुपया वधारल्यामुळे आयात महागात पडते. मात्र दिर्घ पल्ल्यात सोन्याचे दर वाढत जाण्याची शक्यता कमी आहे. कारण जागतिक आर्थिक परिस्थिती करोनावरील लसीमुळे सुधारण्याची शक्यता आहे.