नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे भारतीय बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर नऊ रुपयांनी कमी होऊन 52, 592 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 487 रुपयांनी कमी होऊ 58, 477 प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,789 डॉलर व चांदीचा दर 20.13 डॉलर या प्रति औंस पातळीवर होता.
जागतिक पातळीवर मंदी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि चीन दरम्यान तैवान वरून मतभेद वाढत आहेत. यामुळे काही गुंतवणूक सोने आणि चांदीकडे वळत असल्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात सोन्याचे दर वाढत राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली