पणजी – गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून यामध्ये मुंबईच्या टीव्ही अभिनेत्रीसह चौघांना अटक केली आहे. पणजीजवळील संगोल्डा गावात हा प्रकार घडला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिला आणि हैदराबादमधील एका पुरुषाला अटक केली आहे. टीव्ही अभिनेत्री आणि दुसरी महिला मुंबईजवळील विरार येथील रहिवासी आहेत. तिसरी महिला हैदराबाद येथील आहे.
The Crime Branch of Goa Police has busted a sex racket operating in Sangolda village near Panaji and rescued three women, including a TV actress, from Mumbai and arrested a man from Hyderabad.
— ANI (@ANI) March 19, 2022
गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून सांगोल्डा येथील एका हॉटेलमध्ये डमी गिऱ्हाईक पाठवून हैदराबादच्या एका व्यक्तीशी 50 हजार रुपयांना सौदा केला. यानंतर त्या दलालाने या महिलांना त्यांच्यासमोर आणले असता पोलिसांनी त्यास अटक केली. हाफिज सैयद बिलाल असे आरोपी दलालाचे नाव असून तो हे सेक्स रॅकेट चालवत होता.