धारवाड : अमित शहा परत जा निदर्शने करण्याचा निर्णय धारवाड शहर जिल्हा आणि ग्रामीण कॉंग्रेसने घेतला आहे. का समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या रॅलीला मार्गदर्शन करण्यासाठी शहा शनिवारी (दि. 18) हुबळीत येणार आहेत.
आम्ही अमित शहा येऊ नका मोहीम मंगळवारी सुरू करत आहोत. शनिवारी करायच्या आंदोलनाची रुपरेषा दोन दिवसांत ठरवली जाईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिलकुमार पाटील यांनी सोमवारी सांगितले.
केंद्र सरकार का आणि एनआरसीच्या मुद्यावरून देशातील जनतेते फूट पाडत आहे, केंद्रकडून राज्याला पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जाहीर केलेला निधी मिळाला नाही. महादायी प्राधीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्राने अद्याप केली नाही, असे आरोप त्यांनी केले. या कारणांमुळेच आम्ही अमित शहा यांना हुबळीत येण्यास विरोध करत आहोत, असे ते म्हणाले.