बहीण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणीला प्रत्येकाला काहीतरी खास द्यायचं असत. मिठाई,ड्रेस आणि चॉकलेट्स यासारखे गिफ्ट तर प्रत्येक वेळी द्यावेच लागते.त्या सोबत द्यावे लागते असे काहीतरी जेणेकरून पुढच्या वर्षापर्यंत बहीण त्या गोष्टीची आठवण काढेल. तुम्हला देखील यंदाच्या रक्षाबंधनाला बहिणीला काही खास द्यायचे असले तर गॅजेट्स प्रकारामध्ये चांगले पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
अँब्रेन पॉवर बँक
जर तुमच्या बहिणीला जास्त प्रवास करायला आवडत असेल किंवा ऑफिसच्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असेल तर तुम्ही पॉवर बँक देखील भेट देऊ शकता आणि Ambrane ची 14,400 mAh पॉवर बँक हा एक चांगला पर्याय आहे. त्याची किंमत 3,999 रुपये आहे. याचे आउटपुट 60W आहे, जे आवश्यक गॅझेट नेहमी चार्ज ठेवण्यास मदत करेल. याच्या मदतीने एकाच वेळी तीन उपकरणे चार्ज करता येतात.
अर्बन ड्रीम स्मार्टवॉच
हे स्मार्टवॉच बहिणीसाठी उत्तम गिफ्टिंग पर्याय ठरू शकते. घड्याळाचा गुलाबी रंग प्रीमियम आणि स्टायलिश दिसतो. या घड्याळाची किंमत 3,499 रुपये आहे. घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट आणि राउंड डायलसह अनेक आरोग्य वैशिष्ट्ये आहेत.
Hearmo HearPods Pro Earbuds
बहीण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर इअरबड्स भेट म्हणून देता येतील. हे केवळ मोकळ्या वेळेत संगीत ऐकण्यासाठी उपयुक्त नाही तर ऑफिस मीटिंग दरम्यान हँड्स फ्री कॉलिंगसाठी देखील मदत करेल. HearPods Pro ची किंमत 2,599 रुपये आहे. हे ग्लॉसी व्हाईट आणि ग्लॉसी ब्लॅक रंगांमध्ये ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. टच कंट्रोल्ससह इअरबडमध्ये नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट आणि 30 तासांचा प्लेटाइम देखील उपलब्ध आहे.
Endefo Entun’z जाझ
जर बहिणीला नृत्य किंवा संगीताची आवड असेल तर तुम्ही स्पीकर देखील भेट देऊ शकता आणि त्यासाठी Endefo Entun’z Jazz हा एक चांगला पर्याय असू शकतो. Amazon वर त्याची किंमत रु.2,844 आहे. हा एक पोर्टेबल स्पीकर आहे आणि 24W ध्वनी आउटपुट ऑफर करतो. हाऊस पार्टी दरम्यान बहिणीला गाणे आवडत असल्यास हे गिफ्ट तिला नक्की आवडेल. यामध्ये रिमोट कंट्रोलसह देखील येते. त्याचा आकार खूपच कॉम्पॅक्ट आहे आणि तो कुठेही नेला जाऊ शकतो.
पोको M6 प्रो मोबाईल फोन
नुकताच रिलीज झालेला POCO M6 Pro ही एक उत्तम भेट ठरू शकते. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरे, स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 SoC,नव्या सुरक्षा यंत्रणेसह अपडेटेड ओएस सॉफ्टवेअर आहे. यासह यामध्ये गोरिला ग्लास देखील आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर डिस्काउंटसह 10,999 रुपयांना हा फोन मिळेल.