नवी दिल्ली – समंथा रुथ प्रकाश आणि नागा चैतन्य यांचा अलीकडेच घटस्फोट झाला. त्यानंतर या सेलिब्रिटी कपलमधील मतभेदाच्या बातम्या खूप रंगायला लागल्या होत्या. आतापर्यंत खूप चर्चा झाली आणि पुन्हाएकदा या सेलिब्रिटी कपलमधील वादावर ठिणगी पडली.
समंथाने एका करोडपती नवऱ्याकडून 50 कोटी रुपये हडपल्याची टीका ट्विटरवर एका ट्रोलरने केली होती. “समंथा रुथ ही घटस्फोटित आणि सेकंड हॅन्ड आयटम आहे. तिने एका जंटलमनकडून 50 कोटी करमुक्त पैसे हडप केले आहेत”, असे या ट्रोलरने म्हटले होते. त्यावर समंथानेदेखील त्वरित उत्तर दिले आहे.
तिने फक्त “गॉड ब्लेस युवर सोल’ असे उत्तर दिले आहे. समंथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर महिन्यात आपण सामोपचाराने घटस्फोट घेत असल्यांचे संयुक्त निवेदनाद्वारे जाहीर केले होते. या काळात सामंथाचे अफेअर सुरू असल्याची आणि तिचा कथित गर्भपात
झाल्याचीही चर्चा झाली होती. तेव्हाही तिने या ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले होते. मात्र काही जणांनी सामंथाला पाठिंबाही दिला होता. त्याबद्दल तिने आपल्या पाठीराख्यांचा आभारही मानले होते.