नगर – सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांच्या परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने थाटण्यास शासनाने परवानगी दिली आहे. नॅकोफ इंडिया लिमिटेड या संस्थेला ही परवानगी मिळाली.
शासकीय रुग्णालयांत स्वतःचे मेडिकल स्टोअर असताना, त्या ठिकाणी मोफत औषधी मिळत असतानाही शासनाने जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. यातच या जेनेरिक दुकानांवर जनऔषधी उपलब्ध नसल्यास इतर ब्रॅंडेड औषधी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील, असेही जाहीर करण्यात आले आहे.
जेनेरिक औषधींची ही दुकाने 24 तास सुरू राहतील.या दुकानातील औषध विक्रीसाठी किमान 3 रजिस्टर्ड औषध निर्मात्यांची नेमणूक कायद्याने बंधनकारक राहील. या दुकानांच्या पाहणीसाठी एक समिती नेमली असून ही समिती वार्षिक अहवाल सादर करेल.