मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी सामोर आली आहे. चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणारी गौतमी पाटील आता वेब सिरीजमध्ये देखील झळकणार आहे. स्वतः गौतमीने माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे.
यावेळी गौतमी म्हणाली, “दोन-तीन गाणी आणि एक चित्रपट तसेच वेब सीरिज वगैरे चालू आहेत, या वेब सीरीज आणि चित्रपट कुठले आहेत, तसेच त्यांच्या नावांबद्दल किंवा त्यांच्या विषयाबद्दल अद्याप गौतमीने कुठलाही खुलासा केलेला नाहीये. ते आत्ताच सांगता येणार नाही, तुम्ही ते प्रदर्शित झाल्यावर पाहालच. असं तिने यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ‘गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय आहे’ आणि त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या ह्याच लावणी कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.