मुंबई – आयपीएल 2023 च्या 43 व्या सामन्यात RCB संघाने 18 धावांनी विजय मिळवला. पण, या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. मैदानावरच झालेल्या या राड्यानंतर सर्व माध्यमांमध्ये केवळ गंभीर कोहलीचीच चर्चा होती. यानंतर दोघांनीही याबाबत भाष्य केले नाही. मात्र आता गौतम गंभीरने एका वृत्त वाहिनीचा व्हिडीओ शेअर करत घडलेल्या प्रकाराबाबत आपले स्पष्ट मत मांडले आहे.
आरसीबी विरुद्धचा सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले. यादरम्यान विराट कोहलीने लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू काइल मेयर्सशी हस्तांदोलन करून त्याच्याशी बोलताच लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर मेयर्सला मागे खेचताना दिसला. अशा परिस्थितीत गौतम गंभीरच्या या वागण्यावर विराट कोहली चांगलाच संतापला आणि कर्णधार फाफ डुप्लेसीला काहीतरी बोलू लागला, यातूनच वादाला सुरुवात झाली आणि दोघेही आपापसात भिडले.
दोघांच्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. यानंतर एक क्रिकेटपटू आणि खासदार असलेल्या गंभीरवर अनेकांनी टीका केली. गंभीरचा अहंकार वाढला आहे अशी देखील टीका मध्यमकर्मीनी त्याच्यावर केली. एका मीडिया हाऊसचा व्हिडीओ शेअर करत गंभीरने या टीकेला ट्विटद्वारे उत्तर दिले आहे.
आपल्या ट्विटमध्ये गंभीर म्हणतो,”दबावाच्या नावाखाली DDCA अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे, क्रिकेटची चिंता म्हणून पैसे घेऊन पीआर करण्यास उत्सुक दिसत आहे, हे कलियुग आहे जिथे पळकुटे आपले नायायालय चालवत आहेत.” गंभीरने यावेळी टीका करणाऱ्या चॅनलचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
Man who ran away from Delhi Cricket citing “pressure” seems over eager to sell paid PR as concern for cricket! यही कलयुग़ है जहां ‘भगोड़े’ अपनी ‘अदालत’ चलाते हैं।
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 3, 2023