मुंबई – सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ ही मालिका मराठी आणि कानडी यांच्यामधल्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. आता ‘जिवाची होतिया काहिली’मध्ये भद्राक्काची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
View this post on Instagram
मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी या मालिकेत पाहायला मिळते आहे. आता ही मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. मात्र कार्तिकच्या एंट्रीमुळे अर्जुन आणि रेवथी यांच्या प्रेमात अडथळा पाहायला मिळतो आहे.
आता मालिकेत एन्ट्री होणार आहे भद्राक्काची. भद्राक्काच्या भूमिकेत उषा नाईक या दमदार अभिनेत्री पाहता येणार आहेत. उषा नाईक यांनी विविध चित्रपट आणि मालिका यांमधून आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. या महिलेकीतून वेगळ्या भूमिकेत त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
भद्राक्का ही रेवथीच्या अप्पांची बहीण आहे. ती कोकटनूरांच्या घरी आल्यानंतर आप्पांचाही थरकाप उडाला आहे. भद्राक्काच्या येण्याने वाड्यात कोणते नवीन वादळ येणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. रेवथी आणि अर्जुन यांच्या आयुष्यात भद्राक्काच्या येण्याने काय बदल होतील, हे आता पाहता येईल.