जुन्नर -आज अंगारक चतुर्थी, त्या निमित्ताने गणेशभक्त श्रीगणेशाच्या नावाने उपवास करतात तसेच मनोभावे आराधना करतात. याच दिवशी गणपती बाप्पाचे टोमॅटोच्या रुपात दर्शन झाले आहे.
गोळेगाव येथील कृषिभूषण तथा लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे सचिव जितेंद्र बिडवई यांनी टोमॅटोची लागवड केली असून तोडणी सुरू आहे.
आज टोमॅटोची तोडणी सुरू असताना एका टोमॅटोचा आकार वेगळा असल्याचे लक्षात आले, अधिक बारकाईने पाहिले असता साक्षात श्रीगणेशाची प्रतिकृती दिसून आली.
गणेशभक्त असलेल्या बिडवई यांना अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पाने टोमॅटोच्या रुपात दर्शन दिल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.