entertainment news – गणेश चतुर्थी 2023 च्या निमित्ताने पूजा एंटरटेनमेंटने कृती सेनन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘गणपत’ चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केले. या पोस्टरमध्ये क्रिती – टायगर दोघेही अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. टायगर श्रॉफ, क्रिती सॅनॉन आणि अमिताभ बच्चन या त्रिकुटाचा ‘गणपत: अ हिरो इज बॉर्न’ हा फुल ऑन एंटरटेनिंग चित्रपट असणार आहे.
निर्मात्यांनी टायगर श्रॉफचे पोस्टर लाँच केले. आता गणेश चतुर्थीच्या निमित्ताने क्रिती सेनॉनच्या लूकचे हे लेटेस्ट पोस्टर समोर आले आहे. तिच्या अॅक्शन-पॅक अवतारात प्रेक्षकांना वेड लावतो आहे.
‘गणपत‘ हा हाय-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सचा उत्तम असणार आहे. ज्याचे दिग्दर्शन विकास बहल करत आहे. यावेळी कृती सेनन आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांचीही जादू पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
तब्बल नऊ वर्षांनंतर टायगर श्रॉफ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री क्रिती सेनॉनची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. याआधी दोघांनीही ‘हिरोपंती’मध्ये काम केले होते जो त्यांचा डेब्यू चित्रपट होता. या दोघांनी पहिल्याच चित्रपटात कमाल केली.