नवी दिल्ली : जागतिक वेटलिफ्टिंग महासंघाने (आयडब्ल्यूएफ) टोकियो ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी गुरूवारी जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताची माजी विश्वविजेती मीराबाई चानू ही महिलांच्या ४९ किलो वजनी गटात आठव्या स्थानावर आहे.
Former world champion weightlifter Mirabai Chanu maintains eighth spot in Olympic qualifier rankings, remains on course to seal a berth for Tokyo Games. #MirabaiChanu #Tokyo2020
— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2020
ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या शर्यतीत २५ वर्षीय वेटलिफ्टर चानूबाई मीरा हिने अद्यापपर्यत २,९६६.६४०६ गुण प्राप्त केले आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरण्यासाठी ४९ किलो वजनी गटात वेटलिफ्टर खेळाडूंना सहा महिन्यांच्या ( नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२०) तीन पीरियड मध्ये प्रत्येक टूर्नांमेंटमध्ये (स्पर्धा) भाग घेणे जरूरीचे आहे. ज्यामध्ये कमीत कमी १ सुवर्ण आणि १ रौप्यपदक लेव्हलची स्पर्धा असणे गरजेचे आहे.
ताज्या क्रमवारीत चीनच्या तीन वेटलिफ्टर खेळाडूं टाॅप-५ मध्ये आहेत. ज्यामध्ये होऊ जिहुई अव्वल स्थानी आहे. पण, ऑलिम्पिक स्पर्धेत एक देश एका वजनी गटात केवळ एक खेळाडू पाठवू शकतो त्यामुळे चीनच्या टाॅप-५ पैकी एकाच खेळाडूला संधी मिळू शकते. पुरूषांच्या ६७ किलो वजनी गटात युवा आॅलिंपिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालर्नुगा २,३१०.९६५३ गुणांसह ३२ व्या स्थानी आहे.