मुंबई – गँगस्टर सुभाष पुजारी उर्फ प्रसाद पुजारी याला अखेर चीनमध्ये अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर गँगस्टर प्रसाद पुजारीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन आले. (Gangster Prasad Pujari deported from China, to land in Mumbai today)
जवळपास 20 वर्षांपासून फरार असलेला पुजारीला चीनमधून भारतात आणले. मुंबईत पुजारीवर हत्या आणि खंडणीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद पुजारी हा सुमारे 20 वर्षांपासून फरार होता, त्यासाठी पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. प्रसाद पुजारीवर मुंबईत खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2020 मध्ये मुंबईत प्रसाद पुजारी विरोधात शेवटच्या वेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनेक वर्षांपूर्वी प्रसाद पुजारी भारतातून पळून चीनमध्ये पोहोचला होता. तेव्हापासून तो चीनमधून आपली टोळी चालवत होता.
भारतीय एजन्सींच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रसाद पुजारीने चीन गाठले आणि एका चिनी महिलेशी लग्नही केले. पण फरार प्रसाद पुजारीचा विशेष एजन्सीनी शोध सुरूच ठेवला होता. अखेर त्याला चीनमध्ये अटक करण्यात आली असून प्रसादला मुंबईत आणण्यात आले आहे.