अजमेर – आज जगभर महिला दिन साजरा करण्यात येत आहे. महिलांच्या सन्मानाबद्दल, सुरक्षिततेबद्दल मोठ-मोठे दावे करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे अजमेरमध्ये गुजरातच्या तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीवर बलात्कार करून आरोपी फरार झाले. पोलिस गस्त घालत असताना त्यांना पीडिता अत्यंत वाईट अवस्थेत दिसली. तरूणीची परिस्थीती पाहून तिला तात्काळ जेएलएन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अजमेरचे डीएसपी मुकेश सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगंज ठाण्याचे पोलीस रात्री गस्तीवर होते. त्यादरम्यान त्यांना एक तरूणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तिला पोलीसांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
काही तरूण तिला अज्ञात स्थळी घेऊन गेले आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ते सर्वजण फरार झाले, असे पीडित तरूणीने पोलीसांना दिलेल्या जबाबत म्हटले आहे.
आरोपींचा शोध सुरू –
डीएसपी सोनी यांनी सांगितले की, पीडिता गुजरातची राहणारी आहे. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या जाबाबनंतर आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
दरम्यान, आज जागतिक महिला दिन असून या दिवशीच तरूणीवर अत्याचार झाल्याने या घटनेमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.