मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महिला, शाळकरी मुली आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या असून काही विकास प्रकल्पांसाठीही निधीची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पावर आता विविध स्थरातून प्रतिक्रिया येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली. चोहोबाजूने येणाऱ्या तुफानाला टक्कर देत राज्याच्या विकासाची नौका बजेटच्या माध्यमातून यशस्वी पार केल्याबद्दल दादांचं मनःपूर्वक अभिनंदन ! सर्व विभागांना न्याय देण्याचं प्रामाणिक काम त्यांनी केल्याचं सांगत आर्थिक स्थिती सुधारल्यावर ही नौका आणखी वेग घेईल, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.
चोहोबाजूने येणाऱ्या तुफानाला टक्कर देत राज्याच्या विकासाची नौका बजेटच्या माध्यमातून यशस्वी पार केल्याबद्दल @AjitPawarSpeaks दादांचं मनःपूर्वक अभिनंदन! सर्व विभागांना न्याय देण्याचं प्रामाणिक काम त्यांनी केलंय. आर्थिक स्थिती सुधारल्यावर ही नौका आणखी वेग घेईल, असा विश्वास आहे. pic.twitter.com/LeOf5gFhEq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 8, 2021
तत्पूर्वी विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कडाडून टीका करण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याचा होता की, मुंबईचा हेच कळल नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.